'यूपीआय'ला AI चे बळ मिळणार; रोज १०० कोटी व्यवहाराचे लक्ष्य; एनपीसीआयचे सीईओ दिलीप आसबे यांची माहिती

देशातील गल्लीगल्लीत सध्या ऑनलाइन पेमेंट सुरू आहे. ५ रुपयांपासून १ लाखापर्यंतचे दैनंदिन व्यवहार सध्या होत आहेत. आता यूपीआयचे व्यवहार रोज १०० कोटींवर नेण्यासाठी ‘एआय’चा वापर केला जाणार आहे, अशी माहिती एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे यांनी दिली.
'यूपीआय'ला AI चे बळ मिळणार; रोज १०० कोटी व्यवहाराचे लक्ष्य; एनपीसीआयचे सीईओ दिलीप आसबे यांची माहिती
'यूपीआय'ला AI चे बळ मिळणार; रोज १०० कोटी व्यवहाराचे लक्ष्य; एनपीसीआयचे सीईओ दिलीप आसबे यांची माहिती
Published on

नवी दिल्ली : देशातील गल्लीगल्लीत सध्या ऑनलाइन पेमेंट सुरू आहे. ५ रुपयांपासून १ लाखापर्यंतचे दैनंदिन व्यवहार सध्या होत आहेत. आता यूपीआयचे व्यवहार रोज १०० कोटींवर नेण्यासाठी ‘एआय’चा वापर केला जाणार आहे, अशी माहिती एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे यांनी दिली.

ते म्हणाले की, देशात डिजिटल पेमेंटचे प्रमाण सातत्याने वाढत असून, देशातील युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच ‘यूपीआय’वर दररोज ७५ कोटींहून अधिक व्यवहार होत आहेत. आता आम्हाला दररोज १ अब्ज व्यवहार गाठण्यासाठी आणि पुढील ५० कोटी नवीन वापरकर्त्यांना जोडण्यासाठी ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी एनपीसीआय, आरबीआय आणि सरकार एकत्रितपणे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आसबे यांनी सांगितले की, यूपीआय नवीन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षा हा एक महत्त्वाचा पैलू ठरेल. फसवणूक रोखण्यासाठी, बनावट खाती शोधण्यासाठी आणि सध्याच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘एआय’चा प्रभावीपणे वापर केला जाईल. यासोबतच, त्यांनी ‘एआय’च्या मदतीने व्यापारी आणि वापरकर्त्यांना सहजपणे कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही भाष्य केले. ऑनबोर्डिंग प्रक्रिया सोपी करण्यासाठी भारतीय भाषा आणि व्हॉईस आधारित उपाय तयार केले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कठोर नियमांची गरज

आसबे यांच्या मते, डिजिटल व्यवहारांची वाढती संख्या पाहता भारताला मजबूत नियमांची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत, काही गडबड किंवा फसवणूक झाल्यास, वापरकर्त्याने ‘एआय’ला काय सूचना दिल्या होत्या आणि कोणत्या कामाला मंजुरी दिली होती, हे सहजपणे तपासता येईल. फिनटेक कंपन्यांसाठी ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल्स’ तयार करण्याची ही एक उत्तम संधी आहे. भारताकडे आधीच भरपूर डेटा उपलब्ध आहे. या डेटाच्या आधारे बँका आणि फिनटेक कंपन्या ‘एआय’ टूल्स विकसित करू शकतात. उदाहरणार्थ, एनपीसीआयचे ‘फिमी’ मॉडेल आताच लाखो ग्राहकांच्या पेमेंटशी संबंधित समस्या काही क्षणांत सोडवत आहे.

जीपे-फोन पेला देणार टक्कर

सध्या यूपीआय मार्केटच्या ८० टक्के भागावर ‘फोनपे’ आणि ‘गूगल पे’चे वर्चस्व आहे. बाजारात निरोगी स्पर्धा कायम राहावी, अशी ‘एनपीसीआय’ची इच्छा आहे. यासाठी कोणत्याही एका ॲॅपचा बाजारपेठेतील हिस्सा ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना ३१ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. जरी यूपीआय ॲप बदलण्याचा खर्च खूप कमी असला, तरी इतर कंपन्यांना बाजारात टिकून राहण्यासाठी एका सक्षम व्यावसायिक मॉडेलची गरज असेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in