यूपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी

इशिता किशोर या परिक्षेत देशातून पहिली आली आहे. गरिमा लोरियाने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर उमा हरति एन हिने तिसरे स्थान मिळवले आहे.
यूपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परिक्षेत मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आहेत. यूपीएससी परिक्षेत देशात पहिल्या तीन मध्ये मुलींनी स्थान पटकावले आहे. इशिता किशोर या परिक्षेत देशातून पहिली आली आहे. गरिमा लोरियाने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर उमा हरति एन हिने तिसरे स्थान मिळवले आहे. www.upsc.gov.in या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्रात देखील युपीएससी परिक्षेत मुलींचे वर्चवस्त पाहालया मिळाले आहे. देशात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्रात देखील पहिल्या स्थानावर मुलीने बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मीरा संखे हिने महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ती देशातून 25 क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कश्मीराने तिसऱ्या प्रयत्नात ही बाजी मारली आहे. या आधी दोन वेळा यशाने तिला हुलकावनी दिली होती. मात्र, यंदा तिने यश मिळवले आहे.

या परिक्षेत एकूण 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 354 विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील आहेत. तर 354 आर्थिक मागास वर्गातून(EWS) आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (OBC) 263 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून 154 विदयार्थ्यानी बाजी मारली आहे. अनुसूचित जमातीमधील 72 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगाकडून 178 जणांची आरक्षित यादी तयार करण्यात आली आहे. तसेच आयएएस या पदासाठी आयोगाने 180 जणांची यादी तयार केली आहे. उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्याना 15 दिवसांनी गुणपत्रिका मिळणार असल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगाकडून 30 जानेवारीपासून या परिक्षेसाठीच्या मुलाखातीला सुरुवात करण्यात आली होती. तीन टप्यात ही परिक्षा घेतली जाते.

logo
marathi.freepressjournal.in