UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार
Photo : X (@airnewsalerts)

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

उमेदवारांची जलद व सुरक्षित पडताळणी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर यशस्वीपणे केल्याची माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार यांनी शुक्रवारी दिली.
Published on

नवी दिल्ली: उमेदवारांची जलद व सुरक्षित पडताळणी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर यशस्वीपणे केल्याची माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार यांनी शुक्रवारी दिली.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाच्या (एनईजीडी) सहकार्याने विकसित करण्यात आलेली ही योजना परीक्षा प्रक्रियेची शुचिता अधिक मजबूत करण्यासोबतच परीक्षा केंद्रांवर उमेदवारांचा प्रवेश अनुभव सुलभकरण्यासाठी आहे, असे कुमार यांनी सांगितले.

यूपीएससी सर्व परीक्षांमध्ये, त्यात नागरी सेवा परीक्षा 'आयएएस, आयएफएस, आयपीएस' यांचा समावेश आहे.

या परीक्षांमध्ये उमेदवारांचा चेहरामोहरा ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा मानस आहे, असे कुमार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, या प्रक्रियेसाठी वाय-फाय उपलब्धता आणि कर्मचारी प्रशिक्षण यांसारख्या बाबी महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात आवश्यक मानक कार्यपद्धती तयार केल्या जात आहेत.

यूपीएससीने १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या 'एनडीए' व 'एनए' (नौदल अकादमी) द्वितीय परीक्षा तसेच सीडीएस द्वितीय परीक्षेत याबाबत प्रायोगिक तत्वावर प्रयोग केला.

गुरुग्राममधील निवडक केंद्रांवर उमेदवारांचा चेहरा त्यांच्या नोंदणी फॉर्ममधील छायाचित्रांशी डिजिटल पद्धतीने जुळवण्यात आले. नवीन प्रणालीमुळे प्रत्येक उमेदवाराची पडताळणी सरासरी फक्त ८ ते १० सेकंदांत पूर्ण झाली. ज्यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ झाली आणि सुरक्षिततेची पातळी वाढली, असे ते म्हणाले.

यूपीएससीने प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या उच्चतम मानकांचे पालन करण्याचे वचन दिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

logo
marathi.freepressjournal.in