भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू

भारताकडून अमेरिकेत पाठवण्यात येणाऱ्या मालावर आज २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लागू झाले आहे. या टैरिफमुळे भारताच्या ५.४ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीला फटका बसू शकतो, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च (जीटीआरआय) नमूद केले आहे.
भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू
Published on

वॉशिंग्टन : अभारताकडून अमेरिकेत पाठवण्यात येणाऱ्या मालावर आज २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लागू झाले आहे. या टॅरिफमुळे भारताच्या ५.४ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीला फटका बसू शकतो, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च (जीटीआरआय) नमूद केले आहे. इनिशिएटिवच्या अहवालात भारतावर ५० टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत विकले जाणारे कपडे, जेम्स ज्वेलरी, फर्नीचर, मासे आदी भारतीय उत्पादने महाग होतील. त्यामुळे त्याची मागणी ७० टक्के कमी होऊ शकते.

आता चीन, व्हिएटनाम, मेक्सिको आदी कमी टॅरिफ असलेले देश हा सर्व माल स्वस्त दरात विकू शकतात. त्यामुळे भारतीय कंपन्यांची अमेरिकन बाजारातील हिस्सेदारी कमी होऊ शकेल.

logo
marathi.freepressjournal.in