हिंदू राष्ट्रवादावर दावोस बैठकीत अमेरिकेची टिप्पणी; भारताच्या विकासाचे कौतुक

जागतिक आर्थिक मंचाच्या या कार्यक्रमात तेजीने वाढत असलेल्या हिंदू राष्ट्रवादा'च्या मुद्यावर चिंता व्यक्त करण्यात आली.
हिंदू राष्ट्रवादावर दावोस बैठकीत अमेरिकेची टिप्पणी; भारताच्या विकासाचे कौतुक

दावोस : अमेरिकन परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अर्थात जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत पुन्हा एकदा भारताच्या मानवाधिकार आणि हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ब्लिंकन म्हणाले, या मुद्द्यावर अमेरिकेने नेहमीच भारतासोबत चर्चा केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताने जे यश संपादन केले आहे, ती असाधारण यशाची कहाणी आहे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आर्थिक मंचाच्या या कार्यक्रमात तेजीने वाढत असलेल्या हिंदू राष्ट्रवादा'च्या मुद्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. याला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री ब्लिंकन म्हणाले, या मुद्यावर भारत आणि अमेरिका राजकीय पातळीवर सातत्याने बोलत आले आहेत. याच बरोबर आमच्या चर्चेत लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दाही असतो. राष्ट्रपती (जो बायडेन) यांनी पदभार स्वीकारला, तेव्हाच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मानवाधिकार आणि लोकशाही संदर्भातील चिंता या दोन गोष्टी महत्त्व देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केला होता. यासंदर्भात आम्ही वेगवेगळ्या देशांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आलो आहोत. काही देशांसोबत अशी चर्चा अधिक बोलकी असते. तर, काही देशांसोबत आमचे संबंध लक्षात घेता, खुलेपणाने चर्चा केली जाते. ज्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. हीच स्थिती भारताची आहे, असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in