अमेरिकेचे संरक्षण, गृहमंत्री भारत दौऱ्यावर ;९-१० नोव्हेंबर रोजी होणार चर्चा

ऑक्टोबर २६-२७ दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची वॉशिंग्टन येथे भेट घेतली होती.
अमेरिकेचे संरक्षण, गृहमंत्री भारत दौऱ्यावर
;९-१० नोव्हेंबर रोजी होणार चर्चा

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड जे ऑस्टीन आणि परराष्ट्रमंत्री अॅन्टनी जे ब्लिंकेन ९ ते १० नोव्हेंबर दरम्यान भारतात येऊन परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह आणि एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते द्विपक्षीय आणि जागतिक विषयांवर चर्चा करणार आहेत.

रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. अशावेळी इस्त्रायल-हमास युद्धाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे हिंदी महासागर-प्रशांत महासागरात चीनची दादागिरी बळावत आहे. या विषयांवर दोन्ही पक्ष चर्चा करतील. चीनचा आक्रमकपणा हा भारत आणि अमेरिका हे दोन्ही देशांसमोरील प्रमुख आव्हान आहे. अशात मे २०२० पासून भारत आणि चीन सीमारेषेवर आमने-सामने उभे ठाकले आहेत. भारताप्रमाणे अमेरिकेचे संबंध देखील चीनसोबत चिघळलेलेच आहेत.

ऑक्टोबर २६-२७ दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची वॉशिंग्टन येथे भेट घेतली होती. दोन दिवसात तब्बल सात तासांपेक्षा अधिक वेळ उभयपक्षांनी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक आणि सखोल झाली. दोन्ही देश संवादाचा मार्ग खुला ठेवून परस्पर संबंध मैत्रीपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in