दलाल स्ट्रीटसाठी यंदाचा आठवडा महत्त्वाचा; अमेरिका-इराण संघर्ष, तेलाच्या किमती निर्णायक ठरणार

अमेरिका-इराण संघर्ष, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा निधी प्रवाह आणि कच्च्या तेलाच्या किमती हे येत्या आठवड्यात दलाल स्ट्रीटसाठी प्रमुख चालक ठरणार असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.
दलाल स्ट्रीटसाठी यंदाचा आठवडा महत्त्वाचा; अमेरिका-इराण संघर्ष, तेलाच्या किमती निर्णायक ठरणार
दलाल स्ट्रीटसाठी यंदाचा आठवडा महत्त्वाचा; अमेरिका-इराण संघर्ष, तेलाच्या किमती निर्णायक ठरणार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : अमेरिका-इराण संघर्ष, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा निधी प्रवाह आणि कच्च्या तेलाच्या किमती हे येत्या आठवड्यात दलाल स्ट्रीटसाठी प्रमुख चालक ठरणार असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. महागाईच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांची अस्वस्थताही वाढत आहे. गुंतवणूकदार अमेरिका-इराण संघर्षातील घडामोडी आणि त्याचा कच्च्या तेलाच्या किमती, महागाई तसेच जागतिक जोखीमभावनेवर होणारा परिणाम यावर बारकाईने लक्ष ठेवतील. ऊर्जा बाजारातील हालचाली आणि रुपयाची दिशा अल्पकालीन बाजाराचा कल ठरवतील, असे रिलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.

बाजारात मोठी अस्थिरता राहण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांची भावना अमेरिका-इराण संघर्ष, राजनैतिक चर्चा आणि जागतिक ऊर्जा बाजारातील हालचालींवर अवलंबून राहील, असे ऑनलाइन ट्रेडिंग आणि वेल्थ टेक कंपनी एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर यांनी सांगितले.

जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मूझ’शी संबंधित कोणत्याही घडामोडींवर बाजार अतिशय संवेदनशील राहतील, असेही त्यांनी नमूद केले. विश्वासार्ह राजनैतिक प्रगती झाली किंवा तणाव कमी झाला, तर शेअर बाजारात शॉर्ट-कव्हरिंगची तेजी दिसू शकते. त्यामुळे उदयोन्मुख बाजारांना आधार मिळेल आणि कच्च्या तेलाच्या किमती काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतात. मात्र, तणाव पुन्हा वाढल्यास, जहाजवाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यास किंवा चर्चेत बिघाड झाल्यास गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू शकतात. त्यामुळे जागतिक स्तरावर शेअर्स, चलने आणि कमॉडिटी बाजारांवर दबाव वाढू शकतो, असे पोनमुडी यांनी सांगितले.

ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०९ डॉलरच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. भू - राजकीय घडामोडींव्यतिरिक्, गुंतवणूकदार रुपयाची हालचाल, संस्थात्मक गुंतवणुकीचा कल आणि जागतिक शेअर बाजाराची कामगिरी यावरही लक्ष ठेवतील, असे पोनमुडी यांनी म्हटले.

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले की, येत्या आठवड्यातही भूराजकीय परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींचा प्रवास हेच मुख्य केंद्रबिंदू राहतील. चीन, अमेरिका आणि भारतातील व्यापक आर्थिक आकडेवारी तसेच अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटी बैठकीचे इतिवृत्त यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

रुपयाच्या हालचालीचा प्रभाव?

रुपयाच्या हालचालींचाही व्यवहारांच्या वातावरणावर प्रभाव पडणार आहे. गेल्या आठवड्यात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९६ च्या खाली घसरला होता.

  • शुक्रवारी कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि महागाईच्या चिंतेमुळे रुपया ९६ प्रति डॉलरच्या खाली कोसळला.

  • या आठवड्यात इंडियन ऑईल, बीपीसीएल, गेल आणि एनटीपीसी या कंपन्या तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in