‘कॉमन सेन्स’ वापरणे गरजेचे! सरन्यायाधीशांनी कनिष्ठ न्यायाधीशांचे टोचले कान; आरोपींना जामीन न देणे संशयास्पद

गंभीर प्रकरणातील आरोपींना न्यायालयातून जामीन न मिळणे हे संशयास्पद आहे. कोणत्याही प्रकरणातील तपशील पाहण्यासाठी ‘कॉमन सेन्स’ मजबूत करण्याची गरज आहे, अशा शब्दात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कनिष्ठ न्यायाधीशांचे कान टोचले.
‘कॉमन सेन्स’ वापरणे गरजेचे! सरन्यायाधीशांनी कनिष्ठ न्यायाधीशांचे टोचले कान; आरोपींना जामीन न देणे संशयास्पद
PTI File Photo
Published on

बेंगळुरू : गंभीर प्रकरणातील आरोपींना न्यायालयातून जामीन न मिळणे हे संशयास्पद आहे. कोणत्याही प्रकरणातील तपशील पाहण्यासाठी ‘कॉमन सेन्स’ मजबूत करण्याची गरज आहे, अशा शब्दात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कनिष्ठ न्यायाधीशांचे कान टोचले.

ते म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयात ज्यांना जामीन मिळायला हवा. त्यांना तो मिळत नाही. त्यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. ज्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळण्याची अपेक्षा असते. त्यांना सुप्रीम कोर्टात यावे लागते. ज्यांना मनमानी पद्धतीने अटक झाली आहे, त्यांना त्रास भोगावा लागतो, असे त्यांनी सांगितले.

येथे झालेल्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रचूड म्हणाले की, कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जे लोक जामीन मागत आहेत, त्यांच्या चिंतेचा विचार करावा लागणार आहे. याची कनिष्ठ न्यायालयांनी दखल घ्यावी.

स्वत:चा ‘कॉमन सेन्स’ वापरणे गरजेचे

सध्या कनिष्ठ न्यायालयांकडून कोणालाही दिलासा देण्याबाबत संशयास्पद परिस्थिती असते, ही मुख्य समस्या आहे. याचाच अर्थ गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कनिष्ठ न्यायालयांकडून जामीन दिला जात नाही. न्यायालयांनी प्रत्येक बाबींकडे तपशीलवार पाहिले पाहिजे. त्यासाठी स्वत:चा ‘कॉमन सेन्स’ वापरणे गरजेचे आहे, असे सरन्यायाधीशांनी बजावले.

logo
marathi.freepressjournal.in