
नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार वाढवण्यासाठी न्यायालयाचा वापर केला जाता कामा नये. न्यायालय केवळ निर्देश देऊ शकते. प्रत्यक्ष कायदा-सुव्यवस्था निर्माण करू शकत नाही, असे विधान देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सोमवारी केले. मणिपूरमधील हिंसाचारासंबंधी विविध याचिकांची सुनावणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले.
सर्वोच्च न्यायालय परिस्थितीचे निरीक्षण करू शकते आणि ती सुधारण्यासाठी काही निर्देश देऊ शकते. पण प्रत्यक्ष कायदा-सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम करू शकत नाही. मणिपूरमधील हिंसाचार वाढवण्यासाठी न्यायालयाचा वापर केला जाता कामा नये, असे चंद्रचूड यांनी म्हटले.
दरम्यान, राज्यात गेले दोन महिने सुरू असलेला हिंसाचार सोमवारीही कायम होता. मणिपूरच्या वेस्ट कांगपोक्पी भागात झालेल्या हिंसाचारात एक पोलीस कर्मचारी मारला गेला, तर अन्य १० जण जखमी झाले.