किडनी रॅकेट उघडकीस; उत्तर प्रदेशात पर्दाफाश, ८ लाखांत काढली जात होती किडनी

उत्तर प्रदेशात एका किडनी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये गरीब व गरजू लोकांना जाळ्यात फसवून आठ ते दहा लाख रुपयांच्या बदल्यात त्यांची किडनी काढून घेण्यात येत असे व नंतर लाखो रुपयांना ती विकली जात असे. पोलिसांनी कानपूरमधील आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
किडनी रॅकेट उघडकीस; उत्तर प्रदेशात पर्दाफाश, ८ लाखांत काढली जात होती किडनी
किडनी रॅकेट उघडकीस; उत्तर प्रदेशात पर्दाफाश, ८ लाखांत काढली जात होती किडनी
Published on

कानपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशात एका किडनी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये गरीब व गरजू लोकांना जाळ्यात फसवून आठ ते दहा लाख रुपयांच्या बदल्यात त्यांची किडनी काढून घेण्यात येत असे व नंतर लाखो रुपयांना ती विकली जात असे. पोलिसांनी कानपूरमधील आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात शस्त्रक्रियेत मदत करणाऱ्या आणि उपकरणांची व्यवस्था करणाऱ्या दोन ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञांचा समावेश आहे.

या रॅकेटचे धागेदोरे दिल्ली, मुंबई, पश्चिम बंगाल आणि हरयाणापर्यंत पसरलेले आहेत. परदेशी नागरिकांनीही या बेकायदेशीर प्रक्रियेचा लाभ घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. 'युनायटेड हॉस्पिटल' नावाचे ३० खाटांचे रुग्णालय चालवणारा भूपेंद्र आणि त्याचा सहकारी रोहित यांचा पोलीस शोध घेत आहेत. भूपेंद्र केवळ पदवीधर असूनही स्वतःला 'एमडी' डॉक्टर असल्याचे सांगत असे.

पोलीस उपायुक्त (पश्चिम) एस. एम. कासिम आबिदी यांनी सांगितले की, दाता आणि घेणार यांच्यातील व्यवहार टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवरून केले जात असत, जिथे गरीब आणि गरजू लोकांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात असे. एका नेपाळी नागरिकासह इतर दात्यांकडून ९ ते १० लाख रुपयांना किडनी घेतली जात होती.

३० मार्च रोजी कानपूर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. कल्याणपूर भागातील मेड-लाईफ, आहुजा आणि प्रिया रुग्णालयांवर छापे टाकून पाच डॉक्टरांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये आहुजा हॉस्पिटलचे मालक डॉ. प्रीती आहुजा, डॉ. सुरजीत सिंग आहुजा आणि अन्य डॉक्टरांचा समावेश होता.

हे संपूर्ण प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा बिहारमधील एका एमबीए विद्यार्थ्याने, आयुषने, पैशांच्या वादावरून पोलिसांकडे तक्रार केली. किडनी दिल्यानंतर त्याला ठरलेल्या १० लाखांऐवजी केवळ ३.५ लाख रुपये मिळाले होते. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.

मध्यस्थ शिवम अग्रवाल याच्या फोनमधून अनेक व्हिडीओ आणि चॅट्स जप्त करण्यात आले आहेत. एका व्हिडीओमध्ये अफझल नावाचा व्यक्ती सुमारे १५ लाख रुपयांच्या रोख रकमेच्या बंडलावर पहुडलेला दिसत आहे, जी रक्कम या रॅकेटमधून कमावलेली असल्याचा संशय आहे. दुसऱ्या एका क्लिपमध्ये, दक्षिण आफ्रिकेची महिला अरेबिका एका खासगी रुग्णालयात प्रत्यारोपणानंतर वेदनेत दिसत आहे.

धक्कादायक व्हिडीओ

मध्यस्थ शिवम अग्रवाल याच्या फोनमधून अनेक व्हिडीओ आणि चॅट्स जप्त करण्यात आले आहेत. एका व्हिडीओमध्ये अफझल नावाचा व्यक्ती सुमारे १५ लाख रुपयांच्या रोख रकमेच्या बंडलावर पहुडलेला दिसत आहे, जी रक्कम या रॅकेटमधून कमावलेली असल्याचा संशय आहे.

दुसऱ्या एका क्लिपमध्ये, दक्षिण आफ्रिकेची महिला अरेबिका एका खासगी रुग्णालयात प्रत्यारोपणानंतर वेदनेत दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, अटकेत असलेला रुग्णवाहिका चालक अग्रवाल हा स्टेथोस्कोपने तिची तपासणी करताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in