Uttarakhand : रुद्रप्रयाग येथे दरड कोसळल्याने १३ जण बेपत्ता ; शोधकार्य युद्धपातळीवर सुरु

यात अनेक लोक गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केदारनाथ यात्रा मार्गावरील गौरीकुंड या ठिकाणी ही दरड कोसळी असल्याची माहिती समोर आली आहे.
Uttarakhand : रुद्रप्रयाग येथे दरड कोसळल्याने १३ जण बेपत्ता ; शोधकार्य युद्धपातळीवर सुरु
Published on

देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी महापूर तसंच दरड कोसळण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. रायगडमधील इर्शाळवाडी येथील दरड कोसळल्याची घटना ताजी असताना आता उत्तराखंडमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यात अनेक लोक गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केदारनाथ यात्रा मार्गावरील गौरीकुंड या ठिकाणी ही दरड कोसळी असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील प्रयागराज या ठिकाणी पूर आल्याने आणि दरड कोसळल्याने १३ लोक बेपत्ता झाले आहे. तसंच या ठिकाणची तीन दुकानं देखील मंदाकीनी नदीत वाहून गेली आहेत.

जिल्हा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत १३ जण बेपत्ता झाले असून त्यापैकी १२ लोकांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. या १२ जणांमध्ये ३ ते १४ वर्ष वयोगटातील ५ चिमुकल्यांचा समावेश आहे. रात्री उशिरापासून या ठिकाणी बचावकर्यास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी ढिगाऱ्यात अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्याने बचाव कार्यकरण्यास अडथळा निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच काही ठिकाणी ठराविक अंतराने दरड कोसळत आहे. मंदाकिनी नदीला पूर आल्या आहे. अशा परिस्थिती बचावर कार्य करण्यास अडचण निर्माण होत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी विमल रावत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

आपत्ती विभागाचे अधिकाऱी दिलीप रजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाची टीम, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस, SDRF, NDRF ची पथकं घटनास्थळी उपस्थित झाली आहेत. तसंच बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in