Video : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे चाक फसले, पोलिसांनी धक्का देऊन बाहेर काढले

सुदैवाने ही घटना घडण्यापूर्वी धामी हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे उतरले होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Video : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे चाक फसले, पोलिसांनी धक्का देऊन बाहेर काढले

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सुरक्षेत एक मोठी त्रुटी समोर आली आहे. सोमवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे मुख्यमंत्री धामी एका शीख संमेलनाला हजेरी लावायला पोहोचले. पोलीस लाईन येथे त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी तात्पूरते हेलिपॅड बनवण्यात आले होते. यावेळी धामी यांच्या हेलिकॉप्टरचे पुढचे चाक जमिनीत फसले. सुदैवाने ही घटना घडण्यापूर्वी धामी हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे उतरले होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

हेलिकॉप्टरचे चाक जमिनीत फसल्याचे कळताच पायलटने तात्काळ सुरक्षा करर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरला धक्का देऊन जमिनीत फसलेल्या चाकाला बाहेर काढले. या घटनेनंतर सुरक्षेबाबत आणि हेलिपॅड निर्मितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

माहितीनुसार, धामी यांचे हेलिकॉप्टर पोलीस लाईनवरील हेलिपॅडवर जेथे उतरायचे होते, त्यापासून थोडे दूर उतरले होते, असे उधमसिंह नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजूनाथ टीसी यांनी सांगितले. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरुन कार्यक्रमस्थळी रवाना झाल्यानंतर पायलटने तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरला पाच मीटर मागे असलेल्या सेंटरपर्यंत धक्का मारण्यास सांगितले. ही एक साधारण बाब असून मीडिया त्याला नको तेवढे महत्व देत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस कर्मचारी हेलिकॉप्टरला धक्का देतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in