उत्तराखंड हिमकडा दुर्घटना; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू; बचावकार्य समाप्त

उत्तराखंडच्या चमोलीत हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंड हिमकडा दुर्घटना; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू; बचावकार्य समाप्त
एक्स @airnewsalerts
Published on

चमोली : उत्तराखंडच्या चमोलीत हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ बेपत्ता मजुरांचा शोध घ्यायला श्वानपथक व हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. यावेळी पहिल्यांदा तीन, तर नंतर एका मजुराचा मृतदेह सापडला.

बद्रीनाथ परिसरातील माणा गावात शुक्रवारी हिमकडा कोसळून ५४ मजूर बर्फाखाली अडकले गेले होते. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्य आपत्कालीन केंद्रावर पोहचून बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच वीज, दूरसंचार व अन्य सुविधा तातडीने देण्याचे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in