उत्तराखंडमध्ये दरडी कोसळून ५ जणांचा मृत्यू ११ बेपत्ता; अनेक घरे जमीनदोस्त

उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने हाहाकार माजविला असून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर ११ जण बेपत्ता झाले आहेत. निसर्गाच्या रौद्रावतारामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन घरे जमीनदोस्त झाली तर अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
उत्तराखंडमध्ये दरडी कोसळून ५ जणांचा मृत्यू ११ बेपत्ता; अनेक घरे जमीनदोस्त
Photo : X (@airnewsalerts)
Published on

डेहराडून: उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने हाहाकार माजविला असून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर ११ जण बेपत्ता झाले आहेत. निसर्गाच्या रौद्रावतारामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन घरे जमीनदोस्त झाली तर अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

चामोली, रुद्रप्रयाग, टेहरी आणि बागेश्वर या जिल्ह्यांना प्रमुख्याने नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे. गुरुवारी रात्रपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बागेश्वर जिल्ह्यातील पौसारी ग्रामपंचायत येथे सहा घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता झाले आहेत तर एक जण जखमी झाला आहे, असे उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून बागेश्वरमध्ये एका व्यक्तीची जखमी अवस्थेत सुटका करण्यात आली तर तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे. चामोली जिल्ह्यातील मोपाता गावात दरड कोसळली त्याखाली एक घर आणि गोठा गाडला गेला. त्यामध्ये दोन जण मरण पावले तर अन्य एक जखमी झाला. त्याचप्रमाणे चामोली जिल्ह्यात २५ गुरे बेपत्ता झाली आहेत. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने रुद्रप्रयाग जिल्ह्यात सहाहून अधिक घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.

रुद्रप्रयाग जिल्ह्यात घर कोसळले त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या ठिकाणी एकून तीनदा ढगफुटी झाली.

धामींनी घेतला आढावा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि बाधित परिसरात मदतकार्य वेगाने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. धामी म्हणाले की, राज्यातील वेगवेगळ्या घटनांसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेतली आहे. रुद्रप्रयागमधील बसुकेदार तालुक्यात बुडेथ डूंगर टोक, चमोली जिल्ह्यातील देवाल परिसरात आणि नैनीताल, बागेश्वर, टिहरीमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in