Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांचा व्हिडीओ समोर ; २४ तास बचावकार्य सुरु

मजुरांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य तिथं राबवत आहे.
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांचा व्हिडीओ समोर ; २४ तास बचावकार्य सुरु

उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेतील अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. मागील 10 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात माती कोसळून तिथं मोठी दुर्घटना घडली होती, यामुळे मजूर आतमध्ये अडकले होतं. स्थानिक प्रशासनाबरोबर केंद्रीय यंत्रणा देखील या बचावकार्यात मदत करत आहेत.

उत्तरकाशीतील सिल्क्यरा इथं 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून बोगद्याच्या आतमध्ये अडकलेले आहेत. त्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. या अडकलेल्या मजुरांना पाईपद्वारे अन्न आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. आता या पाईपद्वारे इंडोस्कोपिक कॅमेरा पाठवून कामगारांची परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे आता बोगद्याच्या आतील मजुरांची परिस्थिती समोर आली आहे.

उत्तरकाशीमधील बोगद्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून एकून 41 मजूर अडकले आहेत. त्या मजुरांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य तिथं राबवत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदाच अन्न पाठवण्यात आलं आहे. ही माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, पहिल्यांदाच अडकलेल्या मजुरांसाठी खिचडी पाठवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in