वैष्णोदेवी : दरड कोसळून दोघांचा मृत्यू

वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. एक भाविक जखमी झाला असून या दुर्घटनेत काही यात्रेकरू अडकले आहेत.
वैष्णोदेवी : दरड कोसळून दोघांचा मृत्यू
Published on

नवी दिल्ली : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. एक भाविक जखमी झाला असून या दुर्घटनेत काही यात्रेकरू अडकले आहेत. सोमवारी दुपारी २.३५ च्या सुमारास पंचीजवळ भूस्खलन झाले. माती पडल्याने रस्त्यावर बांधलेले टिनचे शेड कोसळले. अनेक जण त्यात जखमी झाले. या घटनेनंतर प्रशासनाने मदत आणि बचावकार्य हाती घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात्रेकरूंचा मार्ग मोकळा करण्याच्या कामाला प्रशासन लागले आहे. दरम्यान, एका जखमी यात्रेकरूवर प्राथमिक उपचार करून त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

भूस्खलनानंतर यात्रेचा मार्ग बंद झाला असून मलबा हटवल्यानंतरच हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. श्री माता वैष्णो श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “सकाळपासून पदयात्रेच्या मार्गावर दगड आणि माती कोसळत आहे. आमचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते यात्रेकरूंची मदत करत आहेत. दुपारी २.३५ वाजता मंदिरापासून तीन किमी तूर पंच्छी भागात भूस्खलन झाले. या दुर्घटनेनंतर वैष्णोदेवी यात्रेच्या जुन्या मार्गावरून भाविक मंदिराच्या दिशेने चालू लागले आहेत.”

logo
marathi.freepressjournal.in