देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बिहारमधून धावणार; दिल्लीला ८ तासांत पोहोचणार

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पाटण्याहून धावणार असून ती अवघ्या आठ तासांत दिल्लीला पोहोचणार आहे. या गाडीत आलिशान हॉटेलसारख्या सुविधा पुरविण्यात येणार असून ती प्रतितास १६० किमी. वेगाने धावणार आहे.
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बिहारमधून धावणार
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बिहारमधून धावणार
Published on

पाटणा : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पाटण्याहून धावणार असून ती अवघ्या आठ तासांत दिल्लीला पोहोचणार आहे. या गाडीत आलिशान हॉटेलसारख्या सुविधा पुरविण्यात येणार असून ती प्रतितास १६० किमी. वेगाने धावणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ डबे असतील. यामध्ये एसी-३चे ११, एसी-२चे ४ आणि एसी-१चा १ डबा असेल. एकूण ८२७ जागा असतील, त्यापैकी एसी-३च्या ६११, एसी-२च्या १८८ आणि एसी-१च्या २४ जागा असतील. मागणी वाढल्यास डब्यांची संख्या वाढवली जाऊ शकते. या गाडीचे भाडे साधारणपणे राजधानी एक्स्प्रेसच्या आसपास ठेवले जाण्याची शक्यता आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपरच्या दोन रॅकचे उत्पादन बंगळुरू येथील ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ कारखान्यात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १२ डिसेंबर रोजी पहिला रॅक पाठवला जाईल. यानंतर दिल्ली-पाटणा मार्गावर या ट्रेनची चाचणी (ट्रायल रन) घेतली जाईल. नवीन वर्षापूर्वी ही सेवा सुरू करण्याची तयारी आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. पाटण्याहून दिल्लीसाठी संध्याकाळी सुटेल आणि सकाळी पोहोचेल. त्याचप्रमाणे दिल्लीहून पाटण्यासाठी संध्याकाळी सुटेल आणि सकाळी पोहोचेल. वंदे भारत स्लीपर ही आराम, वेग आणि प्रीमियम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केली आहे. ही ट्रेन १६० किमी/तास वेगाने धावेल आणि कमाल वेग १८० किमी/तास असेल. या ट्रेनचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे तत्काळ वेग पकडणे आणि लवकर थांबणे हे आहे. कोणत्याही स्टेशनवर थांबून पुन्हा वेग पकडण्यासाठी या गाडीला कमी वेळ लागतो.

सध्या देशात १६४ वंदे भारत ट्रेन

सध्या देशभरात चेअर कार असलेल्या १६४ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्या चेन्नईच्या ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’मध्ये बनवण्यात आल्या आहेत. या सेमी-हाय-स्पीड ट्रेन लोकांना आवडल्या आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत ट्रेनची मागणी केली जात होती. पाटणा-दिल्ली मार्गावर याची सुरुवात होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in