वंदे भारत ट्रेन ; मुंबई-शिर्डी ट्रेनमधील जेवणाचा दर्जा, इतर तांत्रिक बाबींबद्दल ट्विटरवर प्रवाशांकडून तक्रारी

तांत्रिक बाबींबद्दल ट्विटरवर प्रवाशांकडून तक्रारी करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
वंदे भारत ट्रेन ; मुंबई-शिर्डी ट्रेनमधील जेवणाचा दर्जा, इतर तांत्रिक बाबींबद्दल ट्विटरवर प्रवाशांकडून तक्रारी
Published on

मुंबई : विमान प्रवासाचा अनुभव देणाऱ्या मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या मार्गावरील आलिशान वंदे भारत ट्रेनला रुळांवर येऊन अवघे ४ दिवस झाले आहेत. मात्र या अल्प कालावधीतच रेल्वेतील तांत्रिक बाबी, जेवणाचा दर्जा आणि इतर गोष्टींबाबत प्रवाशांकडून ट्विटरद्वारे रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत.

मुंबई - शिर्डी या मार्गावरील ठाणे आणि दादर स्थानकात रविवार १२ फेब्रुवारी रोजी दरवाजा उघडला न गेल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. ही घटना ताजी असतानाच वंदे भारत ट्रेनमधील जेवणाचा दर्जा, इतर तांत्रिक बाबींबद्दल ट्विटरवर प्रवाशांकडून तक्रारी करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

१० फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन्ही मार्गावरील वंदे भारत ट्रेनना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. बुलेट ट्रेनप्रमाणे डिझाईन करण्यात आलेल्या या ट्रेनमध्ये बाहेरच्या आलिशान डिझाईनसह आतील भाग देखील सर्व सुविधांनी भरलेला आहे. मात्र याच भव्य आणि सुविधापूर्ण ट्रेनमध्ये महत्त्वाच्या गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये विशेषतः स्वच्छता, खाद्यपदार्थ दर्जा आणि इतर काही गोष्टींचा आलेला खराब अनुभव प्रवाशांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत या प्रवाशाने एक्झिक्युटिव्ह क्लास हा डब्बा ट्रेनच्या मधोमध दिला असल्याने यामधूनच इतर डब्यातील प्रवासी देखील ये-जा करतात. त्यामुळे हा एक्झिक्युटिव्ह डबा गाडीच्या शेवटी किंवा सुरुवातीला असावा अशी सूचना सुचवली आहे. तसेच स्वच्छतेसाठी पारंपारिक पद्धतीऐवजी ट्रेनच्या दर्जाप्रमाणे चांगल्या दर्जाची साहित्ये उपलब्ध करावीत अशी मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in