Vande Bharat train Video: लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला ; वंदे भारत ट्रेनच्या घातपाताचा कट उधळला

रेल्वे रुळावर ट्रेनला उतरवण्यासाठी रुळांवर दगड आणि लोखंडाच्या वस्तू ठेवण्यात आल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
Vande Bharat train Video: लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला ; वंदे भारत ट्रेनच्या घातपाताचा कट उधळला

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. राजस्थानमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला मोठा अपघात टळला आहे. या व्हायरल व्हिडिओत वंदे भारत ट्रेनला घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येत आहे. रेल्वे रुळावर ट्रेनला उतरवण्यासाठी रुळांवर दगड आणि लोखंडाच्या वस्तू ठेवण्यात आल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दगडांचा ढिक करण्यात आल्याचा व्हिडिओत दिसत आहे. उदयपूर-जयपूर वंदे भारत ट्रेन मार्गावरुन जाण्याआधी रुळावर दगड आणि लोखंडाच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. पण लोकोपायलटच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या रुळावरुन दगडं आणि लोखंडी वस्तू काढल्यानंतर वंदे भारत ट्रेन पुढे गेली. जयपूर-उदयपूर वंदे भारत ट्रेन २४ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन राजस्थानची तिसरी वंदे भारत ट्रेन होती.

याप्रकाराबद्दल भारतीय रेल्वेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रण उत्तर पश्चिम रेल्वे आरपीएफ यासंदर्भात कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. काही लोकांनी या प्रकरणीच तक्रार केली असून याची चौकशी केली जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in