वाणिज्य भवन राष्ट्राच्या गती शक्तीला चालना देईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

एक भौतिक आणि दुसरी डिजिटल पायाभूत सुविधांची भेट मिळाली आहे
वाणिज्य भवन राष्ट्राच्या गती शक्तीला चालना देईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या आठ वर्षांपासून सुरु असलेल्या नव्या भारताच्या वाटचालीत देशाच्या नागरिक-केंद्रित प्रशासनाच्या प्रवासाच्या दिशेने आज आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. देशाला एक नवीन आणि आधुनिक व्यावसायिक इमारत तसेच निर्यात पोर्टल लाभले आहे. यात एक भौतिक आणि दुसरी डिजिटल पायाभूत सुविधांची भेट मिळाली आहे, असे या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.

देशाचे पहिले उद्योग मंत्री डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी आहे. स्वतंत्र भारताला दिशा देण्यासाठी त्यांची धोरणे, निर्णय, संकल्प आणि त्यांची पूर्तता अत्यंत महत्त्वाची होती. आज देश त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करत आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.

मंत्रालयाच्या नवीन पायाभूत सुविधांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, व्यवसाय करणे सुलभ करण्याच्या संकल्पाचे नूतनीकरण करण्याची आणि त्याद्वारे ‘जीवन सुलभ’ करण्याचीही ही वेळ आहे. सहज प्रवेश हा या दोघांमधील दुवा असल्याचे ते म्हणाले. सरकारशी संवाद साधण्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत आणि सरकार सुलभतेने उपलब्ध व्हावे हे प्रमुख प्राधान्य आहे. ही दृष्टी सरकारच्या धोरणांमध्ये स्पष्टपणे दिसून येते, असेही ते म्हणाले.

नजीकच्या अनेक उदाहरणांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, आता आपल्याकडे पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या रूपात एक आधुनिक व्यासपीठ आहे. हे वाणिज्य भवन राष्ट्राच्या ‘गती शक्ती’ ला चालना देईल. नवीन वाणिज्य भवन हे या काळात वाणिज्य क्षेत्रात सरकारने केलेल्या कामगिरीचे प्रतिक असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पायाभरणीच्या वेळी त्यांनी जागतिक नवोन्मेष निर्देशांकात नावीन्य आणि सुधारणा करण्यावर भर दिला होता, याची आठवण त्यांनी करुन दिली. भारत आज जागतिक नवोन्मेष निर्देशांकात ४६ व्या क्रमांकावर आहे आणि सतत सुधारणा करत आहे. त्यांनी त्या वेळी व्यवसाय सुलभेबाबतही सांगितले होते, आज ३२ हजारांहून अधिक अनावश्यक अनुपालन काढून टाकण्यात आले आहेत. तसेच इमारतीच्या पायाभरणीच्या वेळी जीएसटी नवीन होता, आज महिन्याला १ लाख कोटी जीएसटी संकलन सामान्य झाले आहे.

GeM बाबत सांगायचे तर, तेव्हा ९ हजार कोटी रुपयांच्या ऑर्डरची चर्चा झाली होती, आज पोर्टलवर ४५ लाखांहून अधिक लघु उद्योजक नोंदणीकृत आहेत आणि २.२५ कोटींहून अधिक किमतीच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान त्यावेळी १२० मोबाईल युनिट्सबद्दल बोलले होते. २०१४ मध्ये ते फक्त २ होते, आज ही संख्या२००च्या पार गेली आहे. आज भारतात २३०० नोंदणीकृत फिन-टेक स्टार्टअप आहेत, ४ वर्षांपूर्वी ते ५०० होते. वाणिज्य भवनाच्या पायाभरणी वेळी भारत दरवर्षी ८ हजार स्टार्टअप्सना मान्यता देत असे, आज ही संख्या १५ हजारांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

गेल्या वर्षी जागतिक अडथळे असूनही, भारताची निर्यात एकूण ६७० अब्ज डॉलर्स म्हणजेच ५० लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षी, देशाने ठरवले होते की, कोणत्याही आव्हानाला न जुमानता, ४०० अब्ज डॉलर्स म्हणजेच ३० लाख कोटी रुपयांच्या व्यापार निर्यातीचा उंबरठा ओलांडला आणि ४१८ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३१ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in