वरुण : माणसासह आकाशात झेपावणारे देशातील पहिले ड्रोन

जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ड्रोनचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते.
वरुण : माणसासह आकाशात झेपावणारे देशातील पहिले ड्रोन

माणसासह आकाशात झेपावणारे ड्रोन भारतीय नौदलात लवकरच दाखल होणार आहेत. हे ड्रोन पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या भारतीय स्टार्टअपने विकसित केले आहे. या ड्रोनला ‘वरुण’ असे नाव देण्यात आले असून ते आगामी काळात नौदलासह देशातील आपत्कालिन परिस्थितीत उपयुक्त ठरणार आहे.

हे ड्रोन १०० किलो वजन घेऊन आकाशी झेप घेऊ शकते. २५ ते ३० किमी अंतर हे ड्रोन अवघ्या ३० मिनिटांत हा पूर्ण करणार आहे. भारतीय नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘वरुण’ ड्रोन हे माणसाला घेऊन आकाशात झेपावणारे देशातील पहिले ड्रोन असणार आहे.

जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ड्रोनचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते. एका अहवालानुसार, या डोनमुळे देशाची टेहळणी यंत्रणा आणि सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकते. याशिवाय, आपत्कालीन मदत आणि वैद्यकीय सहाय्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. ‘वरुण’चा वापर एअर अ‌ॅम्ब्युलन्ससाठी आणि दूरवरच्या भागात माल पोहोचवण्यासाठीही केला जाऊ शकतो.

तांत्रिक बिघाडानंतरही सुरक्षित लँडिंगला सक्षम

कंपनीचे सह-संस्थापक बब्बर यांनी सांगितले की, हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही ‘वरुण’ ड्रोन सुरक्षित लँडिंग करण्यास सक्षम आहे. यात पॅराशूटदेखील आहे. जे बिघाड झाल्यानंतर आपोआप उघडेल आणि ड्रोन सुरक्षितपणे उतरेल.

अमेरिकेत २०१६ मध्ये पहिले मानवासह उडणारे ड्रोन

जगातील पहिले मानवासह उडणारे ड्रोन ‘द एहँग१८४’ अमेरिकेत २०१६ मध्ये तयार करण्यात आले होते. हे एक लहान वैयक्तिक हेलिकॉप्टर असून ते फक्त एक प्रवासी वाहून नेण्यास सक्षम आहे. तसेच ते १०० किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in