नवी दिल्ली : कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (एमडी व सीईओ) अशोक वासवानी यांची निवड झाली आहे. वासवानी हे आंतरराष्ट्रीय बँकर आहेत. वासवानी यांच्या नियुक्तीला आरबीआयने हिरवा कंदील दाखवला आहे. ही निवड तीन वर्षांसाठी आहे. वासवानी हे पगाया टेक्नॉलॉजीस लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. लंडन स्टॉक एक्स्चेंज ग्रुपच्या संचालक मंडळावर ते होते.