मिझोरामच्या वीरमाता वेनमावी यांचा ‘वन इंडिया अवॉर्ड’ने सन्मान

वन इंडिया पुरस्काराने श्रीमती वेनमावी यांचा सन्मान केल्याने या पुरस्काराचाच गौरव वाढला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले.
मिझोरामच्या वीरमाता वेनमावी यांचा ‘वन इंडिया अवॉर्ड’ने सन्मान
PM

मुंबई : पुर्वोत्तर भारताचे इतर प्रदेशांसोबतचे संबंध दृढ करणारी संस्था असा नावलौकिक मिळवलेली ‘माय होम इंडिया’द्वारे ईशान्य भारतासाठी कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा दरवर्षी ‘वन इंडिया अवॉर्ड’ने सन्मान केला जातो. सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते यावर्षीचा हा पुरस्कार मिझोरामच्या वीरमाता, समाजसेविका श्रीमती वेनमावी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. वन इंडिया पुरस्काराने श्रीमती वेनमावी यांचा सन्मान केल्याने या पुरस्काराचाच गौरव वाढला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले. आपल्या मुलाचे तिरंग्यामध्ये गुंडाळलेले शव पाहूनच दुसऱ्या मुलाने सैन्यात भरती होऊन देशसेवा केली पाहिजे, हे मनोमन ठरवले होते, अशा जीवनातील कटू क्षणांचा उल्लेख वेनमावी यांनी आपल्या भाषणातून केला.

logo
marathi.freepressjournal.in