डिसेंबरमध्ये शाकाहारी, मांसाहारी जेवण स्वस्त; कांदा, टोमॅटोच्या किमतीत घट झाल्याचा लाभ

ब्रॉयलरच्या किमतीत मासिक आधारावर ५-७ टक्क्यांनी घट झाल्यामुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत मोठी म्हणजे ५० टक्के घट झाली आहे.
डिसेंबरमध्ये शाकाहारी, मांसाहारी जेवण स्वस्त; कांदा, टोमॅटोच्या किमतीत घट झाल्याचा लाभ

मुंबई : कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत घट झाल्याने शाकाहारी आणि मांसाहारी थाळी किंवा जेवण मासिक आधारावर डिसेंबरमध्ये अनुक्रमे ३ टक्के आणि ५ टक्के स्वस्त झाले, असे सोमवारी एका अहवालात म्हटले आहे.

क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स ॲण्ड ॲनालिटिक्स रिसर्चच्या ‘राईस रोटी रेट’च्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये घरी शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचे दर अनुक्रमे ३ टक्के आणि ५ टक्क्यांनी घसरले. सणासुदीचा हंगाम संपत असताना कांदा आणि टोमॅटोच्या किमती मासिक आधारानुसार १४ टक्के आणि ३ टक्क्यांनी घटल्यामुळे जेवण स्वस्त झाले, असे अहवालात म्हटले आहे. ब्रॉयलरच्या किमतीत मासिक आधारावर ५-७ टक्क्यांनी घट झाल्यामुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत मोठी म्हणजे ५० टक्के घट झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in