जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

ऑगस्ट महिन्यात घरगुती जेवणाचा खर्च किरकोळ वाढल्याचे एका अहवालात मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.
जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच
जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागचप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : ऑगस्ट महिन्यात घरगुती जेवणाचा खर्च किरकोळ वाढल्याचे एका अहवालात मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. स्वदेशी क्रेडिट रेटिंग एजन्सी ‘क्रिसिल’च्या संशोधन शाखेच्या मासिक अहवालानुसार, शाकाहारी थाळीची किंमत वर्षानुवर्ष आणि महिनानुमहिना १ टक्क्याने - ₹२९.५ ने वाढली आहे.

‘क्रिसिल इंटेलिजन्स’च्या अहवालानुसार, मांसाहारी थाळीच्या बाबतीत, ब्रॉयलर कोंबडीच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ झाल्यामुळे थाळीचा खर्च वर्षानुवर्ष ५ टक्क्यांनी ₹५७.५० ने वाढली आहे. तथापि, जुलै महिन्यातील ₹ ५८.३० ने वाढीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये खर्च एका टक्क्याने कमी झाला आहे.

श्रावण महिन्याचा प्रभाव

महिन्याच्या तुलनेत कांद्याच्या किमतीत १७ टक्क्यांची मोठी वाढ झाली. परंतु टोमॅटोच्या दरात ७ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे त्याचा प्रभाव मर्यादित राहिला.

हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यामुळे ब्रॉयलर कोंबडीच्या किमतीत ४ टक्क्यांची घसरण झाली. यामुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत महिन्याच्या तुलनेत १ टक्क्याची घट झाली.

किंमत वाढण्यास कारण की...

  • थाळीचा खर्च वाढताच : बटाटे आणि टोमॅटोच्या किमतीत घसरण झाली असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत कांदा, खाद्यतेल, तांदूळ आणि एलपीजीचे दर वाढल्याने थाळीचा खर्च वाढलेलाच राहिला, असे ‘रोटी राइस रेट’ अहवालात म्हटले आहे.

  • कांद्याचे दर : मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुरवठा कमी झाला. परिणामी, ऑगस्ट २०२६ मध्ये कांद्याचे दर गेल्या वर्षीच्या ₹२८ प्रति किलोवरून ४३ टक्क्यांनी वाढून ₹४० प्रति किलो झाले.

  • इतर घटकांमधील वाढ : खाद्यतेलाच्या दरात ११% आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात १०% वाढ झाली.

  • किमतींवर नियंत्रण ठेवणारे घटक : बटाट्याच्या दरात १२% आणि टोमॅटोच्या दरात २८% घसरण झाल्यामुळे थाळीच्या एकूण खर्चातील मोठी वाढ रोखण्यास मदत झाली.

रब्बी पिकाचा पुरवठा कमी असल्याने, खरीप पिकाचे आगमन उशिरा होणार असल्याने येत्या २-३ महिन्यांत कांद्याचे दर चढे राहण्याची शक्यता आहे.

पुषण शर्मा, संचालक (क्रिसिल)

logo
marathi.freepressjournal.in