वाहन खर्चात वाढीची अपेक्षा: मारुती सुझुकी

लाल समुद्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर जहाजांच्या वाहतूक खर्चात काही प्रमाणात वाढ होऊ शकते
वाहन खर्चात वाढीची अपेक्षा: मारुती सुझुकी

नवी दिल्ली : सध्या लाल समुद्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर जहाजांच्या वाहतूक खर्चात काही प्रमाणात वाढ होऊ शकते, असे मारुती सुझुकी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मारुतीने गेल्या कॅलेंडर वर्षात सुमारे २.७ लाख कारची निर्यात केली. तथापि, कंपनीच्या परदेशातील शिपमेंटवर या समस्येचा फार मोठा परिणाम होण्याची अपेक्षा नाही, असेही त्यांनी नमूद केले. एमएसआयचे कार्यकारी अधिकारी (कॉर्पोरेट व्यवहार) राहुल भारती यांनी सांगितले की, जागतिक कंटेनर वाहतुकीच्या ३० टक्के आणि जागतिक व्यापाराच्या १२ टक्के वाहतूक लाल समुद्रातून होते. भारताचा युरोपसोबतचा ८० टक्के व्यापार या मार्गावरून होतो.

पुरवठा साखळीवर परिणाम शक्य

मुओनियो (फिनलंड) : लाल समुद्रातील संकटामुळे जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीसाठी पुरवठा साखळी समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पहिल्या तिमाहीत भारतातील ग्राहकांच्या कार वितरणावर परिणाम होत आहे. परंतु येत्या काही महिन्यांत ती सुरळीत होण्याची अपेक्षा आहे, असे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन यांनी पीटीआयला सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in