हैदराबाद : तेलंगणातील विरोधी पक्ष बीआरएसला मोठा हादरा बसला आहे. त्यांचे आमदार तेलम व्यंकट राव यांनी रविवारी मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी आणि त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी पी श्रीनिवास रेड्डी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सूत्रांनी सांगितले की, वेंकट राव यांच्यासह भद्राचलम मतदारसंघातील अनेक बीआरएस नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे सत्ताधारी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. बीआरएसमधून काँग्रेसमध्ये अलीकडेच प्रवेश करणारे ते तिसरे आमदार आहेत.
दरम्यान, बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी, बीआरएस भद्राचलमचे आमदार व्यंकट राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आणि त्यांच्या (राहुल गांधींच्या) पक्षाने एका बीआरएस आमदाराची "शिकार" केली असा आरोप त्यांनी केला. या संबंधात त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, काँग्रेस नावाच्या पक्षाचा हा ढोंगीपणा आहे काल राहुल गांधी यांनी पक्षातील पक्षांतराबद्दल आणि स्वयंचलित अपात्रतेच्या १० वी दुरुस्ती करण्याबद्दल बोलले. आज त्यांच्या पक्षाने निर्लज्जपणे एका बीआरएस आमदाराची शिकार केली. तुम्ही अशा प्रकारची नौटंकी करण्याचे कारणच काय असाही सवाल त्यांनी केला.
यापूर्वी ३१ मार्च रोजी घानपूर (स्टेशन) येथील बीआरएस आमदार आणि माजी मंत्री कदियम श्रीहरी आणि त्यांची मुलगी कदियम काव्या यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
खैरताबादचे आणखी एक आमदार दानम नागेंद्र यांनीही पक्षाचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते सिकंदराबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने सत्ता गमावल्यानंतर अनेक नेत्यांनी बीआरएसचा त्याग केला होता.