दिग्गज खेळाडू ईशांत शर्माचे करिअर धोक्यात

दिग्गज खेळाडू ईशांत शर्माचे  करिअर धोक्यात

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेप्रमाणेच आता दिग्गज खेळाडू ईशांत शर्माचे करिअर धोक्यात असल्याचे दिसत आहे. या खेळाडूचे करिअर संपल्यात जमा असल्याची चर्चा आहे. त्याला सतत टीम इंडियातून डावलले जात आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टीम इंडियात त्याला संधी देण्यात आली नाही. शिवाय, त्याला इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठीही वगळण्यात आले आहे.

ईशांतला पुन्हा टीम इंडियात संधी मिळणे कठीण झाले आहे. टीम इंडियातून त्याचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. ईशांतने २०२१मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर ईशांतला पुन्हा टीम इंडियात संधी देण्यात आली नाही. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर सारखे खेळाडू असल्याने स्पर्धा खूप मोठी आहे.

या खेळाडूंमुळे ईशांतकडे दुर्लक्ष होत आहे. ईशांतने १०५ कसोटी सामन्यांत ३११ विकेट्स घेतल्या आहेत. तो गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात असल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in