दिनेशकुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख

दिनेशकुमार त्रिपाठी यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला आणि ते १ जुले १९८५ मध्ये नौदलात दाखल झाले.
दिनेशकुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख

नवी दिल्ली : व्हाइस ॲडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांची देशाचे नवे नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान ॲडमिरल आर. हरिकुमार यांच्याकडून त्रिपाठी हे महिनाअखेरीस पदाची सूत्रे स्वीकारतील. व्हाइस ॲडमिरल त्रिपाठी हे सध्या नौदल उपप्रमुख आहेत.

दिनेशकुमार त्रिपाठी यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला आणि ते १ जुले १९८५ मध्ये नौदलात दाखल झाले. नौदलात त्यांनी गेली ३० वर्षे विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ‘आयएनएस विनाश’ या युद्धनौकेचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. त्रिपाठी यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि नौसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. नौदलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी त्रिपाठी हे नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर होते. रिअर ॲडमिरल या नात्याने त्रिपाठी यांनी पूर्वेकडील क्षेत्रातही कमांडिंग ऑफिसर म्हणून काम पाहिले होते. अत्यंत प्रतिष्ठेच्या भारतीय नौदल अकादमीचेही ते प्रमुख होते. सैनिक स्कूल रेवा आणि एनडीए खडकवासला येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

logo
marathi.freepressjournal.in