
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे, तर मतदान ९ सप्टेंबरला होणार आहे. उपराष्ट्रपती जनदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. ही १७ वी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २५ ऑगस्ट आहे.
‘एनडीए’चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार मोदी-नड्डा ठरवणार
केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की, ‘एनडीए’चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे अधिकार पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना देण्यात आले आहेत. रालोआच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.