Video : विधवा महिला प्रियकरासह गावी परतली, लोकांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केली

महिला विधवा असून 5 मुलांची आई आहे. तिच्या पतीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते.
Video : विधवा महिला प्रियकरासह गावी परतली, लोकांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केली

उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये एका विधवा महिलेला आणि तिच्या प्रियकराला खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, ही घटना फरेंद्र पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात घडली. महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. मंगळवारी ती त्याच्यासोबत गावी परतली. याबाबत समजताच संतप्त गावकऱ्यांनी दोघांना कॅम्पियरगंज-मोदीगंज रोडजवळ खांबाला बांधले आणि मारहाण केली. दोघेही वारंवार सोडून देण्याची विनवणी करत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी दखल घेत एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला विधवा असून 5 मुलांची आई आहे. तिच्या पतीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्यावर ती त्याच्यासोबत पळून गेली आणि काही वर्षांपासून त्याच्यासोबतच राहत होती. यावर काही ग्रामस्थांसह तिच्या सासरच्या मंडळींचाही आक्षेप होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. तर, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in