Video :मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यात बस-डंपरचा भीषण अपघात; १३ जणांचा होरपळून मृत्यू, व्हिडीओ झाला व्हायरल

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Video :मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यात बस-डंपरचा भीषण अपघात; १३ जणांचा होरपळून मृत्यू, व्हिडीओ झाला व्हायरल
PM

मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यात काल रात्री भीषण अपघाताची घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस पलटी झाली आणि आग लागली. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. तर 14 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजत आहे.

कसा झाला अपघात?

स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि डंपरचा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला. गुना - आरोन महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. डंपर महामार्गावर उलट्या दिशेने येत होता. त्यावेळी डंपरने प्रवाशी बसला जोरदार धक्का दिला. डंपरची धडक बसल्यामुळे बस पलटी झाली. त्यानंतर बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीची घोषणा

गुना येथे झालेल्या भीषण अपघातावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्याशिवाय त्यांनी आर्थिक मदतीची घोषणाही केली. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्स (ट्विटर) वर म्हणाले की, "गुनावरुन आरोनला जाणाऱ्या बसमध्ये भीषण आग लागल्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजलं, हे वृत्त वाचून दु:ख झाले. या हृदयविदारक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हा प्रशासनला अपघातातील मृताच्या कुटुंबियांना 4-4 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय जखमींना 50- 50 हजारांची मदत देण्याची निर्देश दिले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचारासाठी सर्व मदत करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. त्याशिवाय या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशाप्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून या अपघाताची चौकशी होणे गरजेचं आहे."

logo
marathi.freepressjournal.in