Video : कलेक्टरनी ट्रक चालकाची 'औकात' काढली; मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी केली

अशी भाषा आमच्या सरकारमध्ये सहन केली जाणार नाही. मी स्वत: मजूर परिवारामधून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Video : कलेक्टरनी ट्रक चालकाची 'औकात' काढली; मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी केली

'हिट अँड रन' कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ट्रक चालकांच्या बैठकीत एका चालकाची 'औकात' काढणे कलेक्टरला चांगलेच महागात पडले. या बैठकीतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हाधिकाऱी किशोर कन्याल यांची हकालपट्टी केली आहे.

काय आहे प्रकरण?

'हिट अँड रन' कायद्याविरोधात मध्य प्रदेशच्या शाजापुरमध्ये ट्रक चालकांकडून उग्र आंदोलन करण्यात आले. शाजापुरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी ट्रक चालकांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशा सुचना केल्या. यावेळी संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका चालकाला तुझी काय 'औकात' आहे असे म्हटले. यावर चालकाने "हिच तर लढाई आहे की, आमची काही औकात नाही", असे उत्तर दिले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच गदारोळ उडाला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कन्याल यांची पदावरुन हलाकपट्टी केली. अशी भाषा आमच्या सरकारमध्ये सहन केली जाणार नाही. मी स्वत: मजूर परिवारामधून आलो आहे, अधिकाऱ्यांनी आपली वागणूक आणि भाषेवर लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी कारवाई करताना म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in