रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड; चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती: गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

भक्तांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी तसेच, चेंगराचेंगरी होऊन काही अघटित घडू नये यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचा मोठा फौजफाटा दैनात करण्यात आला.
रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड; चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती: गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

अयोध्येत काल मोठ्या उत्साहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. तसेच, देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. सोहळा संपन्न झाल्याच्या दुसऱ्यादिवशी भाविकांनी मंदिराबाहेर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

गर्दीमुळे प्रशानसाची दमछाक-

आजपासून अयोध्येतील राम मंदिर सर्वसामान्य नागरिकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आज पहाटे तीन वाजेपासूनच रामभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी भक्तांची संख्या खूप जास्त असल्याने चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचे व्हिडिओ समोर आले असून त्यात लोक धावपळ करताना दिसत आहेत. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केल्याने प्रशानसाची मोठी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भक्तांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी तसेच, चेंगराचेंगरी होऊन काही अघटित घडू नये यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचा मोठा फौजफाटा दैनात करण्यात आला.

रामलल्लाच्या दर्शन आणि पुजेसाठी नियमावली-

आज सकाळी 8 वाजेपासून सर्वसामान्यांसाठी रामलल्लाच्या दर्शनाला सुरुवात झाली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या दर्शन पूजनासाठी नियमावली बनवली असून यानुसार, रामलल्लाची आधीप्रमाणेच पाचवेळा आरती होईल. पहाटे 4 वाजेच्या श्रृंगार आरतीपासून याची सुरुवात होईल. तसेच, भोग चढवणे सुरु राहील.

logo
marathi.freepressjournal.in