Video : मुंबईहून आसामला जाणारे 'ते' विमान बिहारमध्ये पुलाखाली अडकले!

पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने विमानाची सुटका केल्यानंतर या विमानाचा पुढचा प्रवास सुरु झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
Video : मुंबईहून आसामला जाणारे 'ते' विमान बिहारमध्ये पुलाखाली अडकले!

मुंबईहून आसामला जाणारे एक भंगारातील विमान बिहारमधील एका पुलाखाली अडकल्याची घटना घडली आहे. बिहारच्या मोतिहारीतील पिप्रकोठी पुलाखाली आज(29 डिसेंबर) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हे विमान पुलाखाली अडकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे हे विमान एका भल्यामोठ्या ट्रकवर ठेवण्यात आले आहे. हा ट्रक पुलाखालून जात असताना विमान त्यात अडकले. यामुळे येथे मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने विमानाची सुटका केल्यानंतर या विमानाचा पुढचा प्रवास सुरु झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये आंध्रप्रदेशच्या बापटला जिल्ह्यातील पुलाखाली एक भंगारातील विमान अडकले होते. हैदराबादच्या 'पिस्ता हाऊस' या लोकप्रिय रेस्टॉरंटच्या मालकाने केरळात झालेल्या लिलावात हे विमान विकत घेतले होते. त्यावेळी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर, ऑक्‍टोबर 2021 मध्ये एक विमान दिल्ली विमानतळाजवळील एका पुलाखाली अडकले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in