व्हिएतजेटची दा नांगसाठी, दोन नव्या थेट फ्लाइट्सची घोषणा

भारताच्या दोन सर्वात मोठ्या सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय केंद्रस्थानांशी थेट जोडली जाणार
व्हिएतजेटची दा नांगसाठी, दोन नव्या थेट फ्लाइट्सची घोषणा

मुंबई :– व्हिएतजेट एअरलाइन्सने मुंबई आणि दिल्ली ते दा नांगदरम्यानच्या दोन नव्या थेट फ्लाइट्स सुरु केले आहेत. VJ830 आणि VJ984 या अनुक्रमे नवी दिल्ली आणि मुंबई येथून येत असलेल्या दोन फ्लाइट्ससह आता व्हिएतनामची ‘मोस्ट लिव्हेबल सिटी’ भारताच्या दोन सर्वात मोठ्या सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय केंद्रस्थानांशी थेट जोडली जाणार आहे. दा नांग – नवी दिल्ली दरम्यानच्या रिटर्न फ्लाइटस मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सुटतील तर दा नांग- मुंबई दरम्यानच्या रिटर्न फ्लाइट्स सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी उपलब्ध असतील.

व्हिएतजेटने व्हिएतनाम आणि दक्षिणपूर्व व उत्तरपूर्व आशियादरम्यानच्या आंतरराष्ट्रीय प्रवासामार्गाचा पाया घातला आहे. या नव्या उड्डाणमार्गांमुळे आता भारतीय प्रवाशांना व्हिएतनामच्या हृदयस्थानी असलेल्या शहरात पोहोचता येणार आहे; ज्यामुळे प्रवास, पर्यटन, व्यापार आणि संस्कृती या सर्वांवरच सकारात्मक परिणाम होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in