चेन्नई : करुर येथे अभिनेते, राजकीय नेते विजय यांच्या प्रचारसभेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमागे सभेच्या व्यवस्थापनातील त्रुटी कारणीभूत असल्याची टीका तमिळग वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षावर सर्व स्तरांतून होत असताना हा द्रमुकचा कट असल्याचा आरोप विजय थलापती यांनी केला आहे. तसेच या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करून टीव्हीकेने मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई येथील खंडपीठाकडे धाव घेतली.
जे नुकसान झाले ते पाहता, ही रक्कम काहीच नाही. तुमचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई केलीच जाऊ शकत नाही. मात्र, दु:खाच्या या प्रसंगी तुमच्यासोबत उभे राहणे आणि तुमचे दु:ख हलके करणे माझे कर्तव्य आहे, असे विजय यांनी नमूद केले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणि विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश द्यावा, असे म्हणणे पक्षाने रविवारी मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. एम. दंडपाणी यांच्यासमोर मांडले.
दुसरीकडे या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या सेंथिलकन्नन यांनी रविवारी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या घटनेची चौकशी होईपर्यंत पक्षाच्या नेत्याला आणखी कोणतीही जाहीर सभा घेण्याची परवानगी न देण्याचे निर्देश तमिळनाडूच्या पोलीस महासंचालकांना द्यावेत, अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे. ही दुर्घटना केवळ एक अपघात नाही, तर बेजबाबदार नियोजन, गैरव्यवस्थापन आणि जनतेच्या सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष यांचे थेट परिणाम आहेत.
पुरेसे बॅरिकेडही नव्हते, प्रचार वाहन अशा प्रकारे उभे केले होते की, गर्दीचे योग्य नियोजन झाले नाही.