मणिपुरात पुन्हा हिंसाचार ; तिघांचा मृत्यू

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे
मणिपुरात पुन्हा हिंसाचार ; तिघांचा मृत्यू

गुवाहाटी : मंगळवारी सकाळी सात वाजता मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा दलांकडून मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सकाळी ७ वाजता घडली. कुकी-झोमी जमातीतील तीन गावकरी एका वाहनातून प्रवास करीत होते. तेव्हा कांगपोकपी जिल्ह्यातील इरेंग नागा खेड्याजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये सातेनोव तुबार्इ, एंगम्मीनलून लॉव्हूम आणि एंगम्मीनलून किपगेन यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. अधूनमधून गोळीबार आणि त्यात मृत्यू होण्याच्या घटना घडतच आहेत. शुक्रवारी देखील दोघांचा मृत्यू, तर आसाम रायफल आणि मणिपूर पोलिसांमधील काहीजण जखमी झाले होते. सरकार आता या वांशिक दंगलींवर राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या डोंगराळ भागातील नगरपरिषदांना अधिक स्वातंत्र्य देण्यास तयार असल्याचे केंद्र सरकारला कळवले आहे, मात्र कुकींना स्वतंत्र प्रशासन देण्यास सरकार तयार नाही. कारण राज्यात अन्य वंशाचे लोकही आहेत.

logo
marathi.freepressjournal.in