मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली; एकाचा मृत्यू, १६ जखमी

इम्फाळ : मणिपूरमध्ये कुकी व मैतेईचे प्राबल्य असलेल्या भागात दोन वर्षांनंतर वाहतूक शुक्रवारपासून खुली झाली. मात्र, ही वाहतूक सुरू होताच राज्यात पुन्हा हिंसा भडकली आहे. दरम्यान, सुरक्षा दल व आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली; एकाचा मृत्यू, १६ जखमी
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली; एकाचा मृत्यू, १६ जखमीX - @kso_shillong
Published on

इम्फाळ : मणिपूरमध्ये कुकी व मैतेईचे प्राबल्य असलेल्या भागात दोन वर्षांनंतर वाहतूक शुक्रवारपासून खुली झाली. मात्र, ही वाहतूक सुरू होताच राज्यात पुन्हा हिंसा भडकली आहे. दरम्यान, सुरक्षा दल व आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले.

इम्फाळ, चुराचांदपूर, कांगपोकपी, विष्णुपूर आणि सेनापती आदींना जोडणाऱ्या रस्त्यावरून बस वाहतूक सुरू झाली. त्याचवेळी कुकी समाजाच्या लोकांनी त्याला विरोध सुरू केला. आंदोलकांनी ही वाहतूक बंद करण्यासाठी रस्त्यावर दगड टाकले. तसेच झाडे कापून रस्त्यावर टाकली. त्याचबरोबर रस्त्यावर वाहने रोखून धरली. बस व कारना आगी लावल्या. हिंसा करणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी लाठीमार केला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी दगडफेक केली.

सुरक्षा दलांनी पॅलेट गनचा वापर केला. काही जखमींच्या शरीरात पॅलेट गनच्या छऱ्याच्या खुणा दिसत आहेत. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

इम्फाळ, चुराचांदपूर, कांगपोकपी, विष्णुपूर आणि सेनापती येथे जाणाऱ्या सरकारी बसना सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच अतिसंवेदनशील भागात जागोजागी सुरक्षा दल तैनात केले.

logo
marathi.freepressjournal.in