मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक चार जणांचा मृत्यू

तपासासाठी १३० ठिकाणी नाकाबंदी केली असून आतापर्यंत एकूण १६४६ जणांना ताब्यात घेतले आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक चार जणांचा मृत्यू

गुवाहाटी : गेल्या चार महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचाराचा पुन्हा उद्रेक झाला असून गुरुवारी चुडाचंदपूर आणि बिष्णूपूर या सीमावर्ती जिल्ह्यांत दोन गटांमध्ये पुन्हा गोळीबार सुरू झाला आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन पोलिसांसह आणखी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन आदिवासी गटांत बुधवारपासूनच गोळीबार सुरू झाला होता. एकूण पाच जण गंभीर जखमी झाले होते. पैकी तिघांना चुडाचंदपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सुरू झालेला गोळीबार अधूनमधून गुरुवारी देखील सुरू होता. गुरुवारी बिष्णूपूर येथे एक जण, तर चुडाचंदपूर येथे चार जण गंभीर जखमी झाले होते, अशी माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली आहे. जखमींपैकी गुरुवारी सकाळी कुकी-झुमी समुदायातील दोन जण उपचारादरम्यान मृत झाले. त्यापैकी एकाचे नाव एल. एस. मांगबोर्इ असल्याचे समजले आहे. ही व्यक्ती उपचारासाठी नेतानाच मृत झाली. इतरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, सुरक्षा दलांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. विशेषत: कांगपोप्की, थाउबल, चुडाचंदपूर आणि पश्चिम इम्फाळ या हिंसाचार प्रवण जिल्ह्यात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शोधमोहिमेदरम्यान ५ हत्यारे, ३१ दारू सामान, १९ विस्फोटके आणि बॉम्ब तयार करण्याच्या साहित्याची तीन पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांनी तपासासाठी १३० ठिकाणी नाकाबंदी केली असून आतापर्यंत एकूण १६४६ जणांना ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in