आंध्र प्रदेश, प. बंगालमध्ये हिंसाचार

आंध्र प्रदेशातील १७५ विधानसभा आणि २५ लोकसभा मतदारसंघांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे.
आंध्र प्रदेश, प. बंगालमध्ये हिंसाचार

कोलकाता : आंध्र प्रदेशातील १७५ विधानसभा आणि २५ लोकसभा मतदारसंघांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे. तेथील पालनाडू, कडप्पा आणि अन्नमय जिल्ह्यांमध्ये टीडीपी आणि वायएसआरसीपी या पक्षांनी एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले. वायएसआरसीपीने निवडणूक आयोगाला लिहून टीडीपीद्वारे वेमुरू, दारसी, इच्छापुरम, कुप्पम, माचेर्ला, मरकापुरम, पलाकोंडा आणि पेडाकुरापौडू यासह अनेक विधानसभा विभागांमध्ये निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. वायएसआरसीपीने आरोप केला की, टीडीपी नेत्यांनी वेमुरू मतदारसंघातील पाच मतदान केंद्रे ताब्यात घेतली.

पश्चिम बंगालच्या आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. बीरभूम आणि वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत विविध भागात टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. वर्धमान-दुर्गापूरमध्ये भाजपचे उमेदवार दिलीप घोष यांच्या ताफ्यावर दोन ठिकाणी दगडफेक करण्यात आली. टीएमसी, भाजप आणि काँग्रेस-सीपीआय (एम) युतीने मतदानाच्या पहिल्या काही तासांमध्ये हिंसाचार, मतदारांना धमकावणे आणि पोलिंग एजंट्सवर हल्ले केल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in