व्हीआयपींना मिळणार महाप्रसाद

प्रसादासाठीचा कोणताही पदार्थ बाजारातून खरेदी करण्यात आलेला नाही.
व्हीआयपींना मिळणार महाप्रसाद

अयोध्या : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत आलेल्या प्रत्येक व्हीआयपीला महाप्रसाद वाटण्यात येणार आहे. त्यासाठी श्रीश्राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कडे २० हजारांपेक्षा अधिक महाप्रसादाची तयार पाकिटे पोहोचली आहेत.

महाप्रसाद पाच प्रकारची ड्रायफ्रूट, साखर, बेसन या पदार्थांपासून शुद्ध तुपात तयार करण्यात आला आहे. गुजरातच्या भगवा सेना भारती गर्वी आणि संत सेवा संस्थांन यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली हा महाप्रसाद तयार केला आहे. तसेच महाप्रसाद तयार करण्यासोबत अयोध्येत येणाऱ्या साधूसंतांच्या भोजन आणि निवासाची जबाबदारी देखील या संस्थांकडे सोपवण्यात आली आहे. तब्बल ५ हजार किलो सामान वापरुन २०० जणांच्या पथकाने महाप्रसाद तयार केला आहे. महाप्रसादाची पवित्रता व शुद्धता राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

प्रसादासाठीचा कोणताही पदार्थ बाजारातून खरेदी करण्यात आलेला नाही. सनातनी श्रद्धेनुसार महाप्रसादात दोन लाडू, शरयूचे पाणी, अक्षता, सुपारी, कालावा यांचा समावेश आहे. २० हजार पाकीटे ट्रस्टच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. ट्रस्ट कडून दररोज पाच हजार संताना भोजन पुरवले जात आहे. हे सर्व संत उदासीन आश्रम रानोपाली येथे निवास करीत आहेत. प्रत्येक साधूला ब्लॅंकेट, उशी, बेडशीट समावेश असलेला एक संच देण्यात आला आहे. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास येणाऱ्या प्रत्येकाच्या भोजनाची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. वारणसी आणि दिल्लीतून आलेले शेफ हे भोजन तयार करणार आहेत. या शिवाय पाहुण्यांना ठेप्ला, बदाम बर्फी, मटर कचोरीचा नाश्ता देखील पुरवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in