Viral Video : बायको रुसली, तक्रार करायला थेट पोलिसांत पोहोचली; पतीने रोमँटिंक गाणं गायलं अन् भांडण मिटलं

हा व्हायरल व्हिडियो उत्तर प्रदेशातील झांसी येथील असल्याचे दिसत आहे. यात पत्नी पत्नीत काही कारणाने वाद झाल्याने पत्नी पतीविरोधात पोलिसात तक्रात दाखल करायला पोहचली होती. मात्र...
Viral Video : बायको रुसली, तक्रार करायला थेट पोलिसांत पोहोचली; पतीने रोमँटिंक गाणं गायलं अन् भांडण मिटलं

आज अगदी लहानसहान करणांवरुन नात्यात कटुता येते. समज गैरसमज यामुळे नाती दुरावतात. काही जोडप्यांकडून टोकाचे किंवा नाते तोडण्याचे देखील निर्णय घेतले जातात. आज नाते जोडण्यापेक्षा ते टिकवून ठेवण्यासाठी जास्त कसरत करावी लागते. सध्या समजून न घेणे, वेळ न देणे, तसेच अन्य काही कारणांमुळे समाजात घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. मात्र नात टिकवण्याची ओढ दोन्ही बाजूंनी असली तर ते नाते शेवटपर्यंत टिकते हे मात्र खरे.

आज कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येकाच्या घरात भांडणे होतात. संसार म्हटला म्हणजे भांड्याला भांडे लागतेच असेही म्हणतात. पण कोणती गोष्ट किती ताणून धरायची याचे ज्यांना भान असते त्यांचे मात्र या भाडणातून देखील प्रेम फुलत असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत रुसलेल्या पत्नीला पती गाणे गाऊन तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यात तो यशस्वी देखील झाला आहे.

हा व्हायरल व्हिडियो उत्तर प्रदेशातील झांसी येथील असल्याचे दिसत आहे. यात पत्नी पत्नीत काही कारणाने वाद झाल्याने पत्नी पतीविरोधात पोलिसात तक्रात दाखल करायला पोहचली होती. मात्र पती काही हार मानताना दिसत नाही. तो आपल्या पत्नीचा राग घालवण्यासाठी थेट पोलीस स्थानकातच रोमँटीक असे बॉलिवूडचे गाणे गातो. यावेळी आपल्या पतीने म्हटलेले गाणे ऐकून पत्नीचा राग जायला एक क्षण देखील लागत नाही. पतीने गाणे गायला सुरुवात करताच पत्नी त्याच्या छातीवर डोके टेकवते आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला राग रुसवा संपून त्यांच्यात परत प्रेम फुलते.

हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत खात्रीशिर माहिती नसली तरी सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलीस स्थानकातच हा प्रकार घडल्याने एकाने ही, "पोलिसांची दुसरी बाजू" असल्याचे म्हटले. तर, एकाने या जोडप्याचे कौतूक करत "So Cute" असे म्हटले. एकाने तर "मला खात्री आहे की यांच्यात घरी जाऊन परत भांडण होईल" अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींना या व्हिडिओतील पतीची पत्नीचा राग घालवण्याची पद्धत आवडली. तर काहींनी बऱ्याच दिवसांनी ट्विटरवर(एक्स) काहीतरी चांगले बघीतल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in