Video: भाजप आमदाराला क्रिकेट खेळणे महागात पडले; तोल गेल्याने तोंडावर आपटले, रुग्णालयात दाखल

गोलंदाने चेंडू टाकताच भूपेंद्र सिंह यांनी फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेल्याने ते तोंडावर पडले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Video: भाजप आमदाराला क्रिकेट खेळणे महागात पडले; तोल गेल्याने तोंडावर 
आपटले, रुग्णालयात दाखल

भारताला क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून ओळखले जाते. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण येथे क्रिकेटचा चाहता आहे. भारतात क्वचितच कोणी असेल ज्याला क्रिकेट आवड नसेल. विश्वचषकावेळी तर भारतात एखादा सण उत्सव असल्याप्रमाणे वातावरण निर्मिती होते. अगदी संधी मिळेल तेव्हा लोक बॅट हातात घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात. मात्र, ओडिशातील भाजप आमदाराला क्रिकेट खेळणे चांगलेच महागात पडले आहे.

ओडिशातील नारला मतदार संघाचे आमदार भूपेंद्र सिंह हे मतदार संघातील कालाहांडी येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला गेले होते. यावेळी तरुणांचा उत्साह पाहून भूपेंद्र सिंह यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवारला गेला नाही. त्यांनी बॅट हातात घेत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. गोलंदाजाने चेंडू टाकताच भूपेंद्र सिंह यांनी फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेल्याने ते तोंडावर पडले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया-

भूपेंद्र सिंह यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्याने उपस्थितांनी हा क्षण रेकॉर्ड करायला सुरुवात केल्याने ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने, "क्रिकेटच्या मैदानावर ही स्थिती आहे, राजकीय मैदानात कशी असेल", असे म्हटले.

तर दुसऱ्याने, "आमदार साहेबांना वाटते की, राजकारणापेक्षा जास्त पैसा क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या आयपीएलच्या लिलावासाठी तयार होत आहेत", असे म्हटले आहे.

तर अन्य एकाने, "कलेजा थंडा हो गया" असे मीम शेअर केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in