Viral Video : एमबीएचा विद्यार्थी एका लग्नात फुकटच जेवायला गेला आणि...

अनेकदा काही लोकं दुसऱ्याच्या लग्नात फुकटच जेवायला जातात आणि कधीकधी स्वतःची फजिती करून घेतात, असाच प्रकार मध्यप्रदेशातही घडला.
Viral Video : एमबीएचा विद्यार्थी एका लग्नात फुकटच जेवायला गेला आणि...
Published on

अनेकदा आपण पाहिले आहे की, काही लोकं मज्जा म्हणून दुसऱ्याच्या लग्नात फुकटच जेवायला जातात. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये अनेकवेळा आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र, तुमच्या ओळखीमध्ये असणाऱ्या व्यक्तीने, किंवा तुम्ही स्वतः जर असं काही करण्याचा विचार केलं असेल तर ही बातमी कदाचित तुम्हाला यावर विचार करायला भाग पाडू शकते. मध्य प्रदेशातील एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. यामध्ये एमबीएच शिक्षण घेत असलेला एक तरुण लग्नात फुकटच जेवायला गेला खरा, पकडला गेल्यावर त्याला भांडी धुवायला लावली.

नेमकं प्रकरण काय?

सदर व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण हा एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून भोपाळमध्ये राहत आहे. त्याने एका लग्नात आमंत्रण नसताना जेवणाचं धाडस केलं. पण पकडल्यानंतर त्याला चांगलीच शिक्षा मिळाली. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की त्याला जबरदस्तीने भांडी घासायला लावली आहेत. एक व्यक्ती त्याचे रेकॉर्डिंगदेखील करत आहे. “लग्नात येऊन फुकट खाण्याची शिक्षा काय माहीत आहे का? जसं घरात भांडी घासतोस ना तशी आता इथे घासायची” असे ती ऐकवत आहे. एवढंच नव्हे तर, तुझे आई बाबा तुला पैसे पाठवत नाहीत का तू जबलपूरचे नाव खराब करतो आहेस, असंदेखील तो व्यक्ती त्याला सांगत आहे.

logo
marathi.freepressjournal.in