Viral Video : मेट्रोमध्ये घुसली भूल भुलैयाची मंजुलीका आणि...

अक्षय कुमार आणि विद्या बालनचा 'भूल भुलैया' चांगलाच गाजला होता, यातील विद्या बालनच्या मंजुलीका लूकची चांगलीच चर्चा झाली होती
Viral Video : मेट्रोमध्ये घुसली भूल भुलैयाची मंजुलीका आणि...

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालनचा 'भूल भुलैया' हा चित्रपट २००७मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याची क्रेझ अजूनही जिवंत असून विद्या बालनच्या 'मंजुलीका' लूकची चांगलीच चर्चा झाली होती. आजकाल इंस्टाग्राम रील्सचे वेड एवढे वाढले आहे की, अनेकदा या लूकने लोकांसोबत प्रॅन्क करण्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार दिल्लीतील मेट्रोमध्ये घडला. हुबेहूब मंजुलीकासारखा लूक करून एक मुलगी नोएडा मेट्रोमध्ये घुसली आणि लोकांना घाबरवू लागली. तिला पाहताच प्रवाशांची पळापळ झाली.

नोएडामधील मेट्रोचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या मुलीने लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. एक मुलगा तर इतका घाबरला त्याने तिथून थेट पळच काढला. हा व्हिडियो व्हायरल होताच काहींनी हसण्यावारी हा प्रकार घेतला. तर, काहींनी टीकादेखील केली. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू असून लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in