
सध्या इंडिगो विमानामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. एका प्रवाशाने कॅबिन क्रूकडे चक्क 'बिअर मिळेल का?' अशी विचारणा केली. यामुळे संपूर्ण विमानामध्ये एकच हशा पिकला. दिल्लीवरून गोव्याच्या मोपा विमानतळावर निघालेल्या इंडिगो विमानात एका प्रवशानं कॅबिन क्रू कडे चक्क बिअरची मागणी केली. त्याचा हा भन्नाट प्रश्न ऐकून सर्वच प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.
व्हिडीओमध्ये दिसते की, कॅबिन क्रू विमानामध्ये प्रवाशांचे स्वागत करत होते. विमानामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह प्रवशांमध्येही गोव्याला जाण्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता. "तुम्हा सर्वांना मोपाच्या नवीन विमानतळावर प्रवास करताना पाहण्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत, अशी घोषणा कॅबिन क्रू विमनात करताना व्हिडीओमध्ये दिसते. त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी एक प्रवासी उभा राहून कॅबिन क्रूकडे बिअरची मागणी करतो. प्रवाशाने केलेल्या या अजब मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते.