लहान मुलीचे पियानो वादन पाहून पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक; म्हणाले...

एका चिमुकलीचा पियानो वाजवतानाचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक
लहान मुलीचे पियानो वादन पाहून पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक; म्हणाले...

सोशल मीडियावर अनेक चांगल्या वाईट गोष्टी अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात. एखादा व्हिडीओ व्हायरल होऊन तो अनेक लोकांपर्यंत पोहचला जातो. अशामध्ये अनेक छुप्या कलाकरांना हे एक चांगले प्लॅटफॉर्म मिळालेले आहे. नुकतेच एका चिमुकीलीचा पियानो वंदन करतानाच एक व्हिडीओ समोर आला. त्या मुलीने केलेल्या पियानो वादनाचे कौतुक चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पियानो वाजवणारी ही मुलगी कर्नाटकमधील असून शाल्मली असे तिचे नाव आहे. या व्हिडीओमध्ये तिची आई एका कन्नडमधील गाण्याच्या ओळी तिला गाऊन दाखवत आहे. तर ही चिमुकली पियानोवर ती चाल तंतोतंत वाजवताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांचा हा व्हिडिओ रीट्वीट करत या मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत व तिच्याकडील प्रतिभेचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, "हा व्हिडिओ अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. असामान्य प्रतिभा आणि सर्जनशीलता. शाल्मलीला खूप खूप शुभेच्छा,' असा कौतुकाचा वर्षाव तिच्यावर पंतप्रधानांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in