Video : चहा, भजे अन् नाचगाणे; गँगस्टरचा वाढदिवस दणक्यात साजरा: लुधियाना कारागृहातील व्हिडिओ व्हायरल होताच...

वाढदिवसाची पार्टी सुरु असताना पार्श्वसंगीत म्हणून पंजाबी गायक करण औजलाचे गाणे देखील ऐकू येत आहे. या व्हिडिओत कैदी गाणे म्हणताना, नाचताना, चहा, भजे खाताना दिसत आहेत.
Video : चहा, भजे अन्  नाचगाणे; गँगस्टरचा वाढदिवस दणक्यात साजरा: लुधियाना कारागृहातील व्हिडिओ व्हायरल होताच...

कारागृह म्हटले म्हणजे आपल्यासमोर भयावह चित्र उभे राहते. तुम्ही कोणाला तुरुंगात वाढदिवसाची पार्टी साजरा करताना बघितले आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात कैदी तुरुंगात एका गँगस्टरचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. हा व्हिडिओ पंजाबमधील लुधियाना मध्यवर्ती कारागृहातील असून 15 दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओत कैदी त्यांचा साथीदार असलेल्या गँगस्टरचा मनी राणाचा वाढदिवस साजरा करत आहेत. यात ते त्याला जोर जोराने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच, वाढदिवसाची पार्टी सुरु असताना पार्श्वसंगीत म्हणून पंजाबी गायक करण औजलाचे गाणे देखील ऐकू येत आहे. या व्हिडिओत कैदी गाणे म्हणताना, नाचताना, चहा, भजे खाताना दिसत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी कारागृहात मोबाईल आणि इतर साहित्य कुठून आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर काहागृह प्रशासनाच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. कारागृह प्रशासनाने व्हिडिओची दखल घेतली असून या व्हिडिओत दिसत असणाऱ्या कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लुधियाना मध्यवर्ती कारागृहात घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील असे व्हिडिओ समोर आले आहेत. कधी कैद्यांमधील आपापसात झालेले भांडण तर, कधी तुरुंगातून कैद्याचे पलायन, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in