कंटेनर चालकांमध्ये भीती पसरवणारा 'तो' व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी घेतली दखल

सोशल मिडीयावरुन व्हायरल झालेल्या या व्हिडीओची नाव्हाशेवा पोलिसांनी दखल घेऊन सदर व्हिडीओ तयार करणाऱ्या व तो सोशल मिडीयावर प्रसारीत करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
कंटेनर चालकांमध्ये भीती पसरवणारा 'तो' व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी घेतली दखल

नवी मुंबई : न्हावाशेवा पोर्ट परिसरात कंटेनर घेऊन येणाऱ्या चालकांमध्ये भीती पसरवण्यासाठी काही व्यक्तींकडून कंटेनर चालकांना कापून टाकण्यात येत असल्याबाबत खोटी माहिती पसरवणारा व्हिडीओ सोशल मिडीयावरून सध्या व्हायरल करण्यात आला आहे.

सोशल मिडीयावरुन व्हायरल झालेल्या या व्हिडीओची नाव्हाशेवा पोलिसांनी दखल घेऊन सदर व्हिडीओ तयार करणाऱ्या व तो सोशल मिडीयावर प्रसारीत करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

कंटेनर चालकांमध्ये भीती पसरवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रायगड जिह्यातील न्हावाशेवा पोर्ट परिसरामध्ये कंटेनर चालकांचे गळे कापून टाकून देण्यात येत असल्याचा व आतापर्यंत पाच चालकांना अशाच पद्धतीने मारण्यात आल्याचे सांगत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in